You are currently viewing कणकवली पंचायत समितीच्या कृषी आत्मा अंतर्गत शेतकरी सहल

कणकवली पंचायत समितीच्या कृषी आत्मा अंतर्गत शेतकरी सहल

शेतकऱ्यांना नवनवीन उत्पादन आणि प्रकल्पांची दिली जाणार माहिती

कणकवली

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) जिल्हा अंतर्गत शेतकरी सहल गुरूवार रवाना झाली.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ,कोनबॅक बांबू संशोधन एमआयडीसी कुडाळ व पशुधन विकास केंद्र, निळेली येथे एक दिवसीय शेतकरी सहल आयोजित केली होती.सदर सहलीचा शुभारंभ शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष वसंत तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सभापती मनोज रावराणे,तालुका शहर मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनायक पाटीलतसेच जिल्हापरिषद सदस्य बाळा जठार ,संजय देसाई ,शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे,संजय सावंत,सुभाष मालांडकर,प्रकाश जाधव,आनंद साळसकर,अनिल पेडणेकर,विजय कुडतरकर व शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा