You are currently viewing पेडणेकर ज्वेलर्सनं जपली सामाजिक बांधीलकी

पेडणेकर ज्वेलर्सनं जपली सामाजिक बांधीलकी

कॉटेजला दिले ५ ऑक्सीजन सिलेंडर, पीपीई किट

सावंतवाडी :

राज्यातील लोकप्रिय जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स पेढीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ५ ऑक्सिजन सिलिंडर दिले आहेत. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे मुख्य संचालक आनंद जगन्नाथ पेडणेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला. आपदग्रस्त काळात त्यांच्याकडून शासनाला सदैव मदत कार्य सुरू असते. कोरोना संकट काळात सध्या रुग्णांना प्राणवायूची नितांत आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता आनंद पेडणेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयास पाच ऑक्सीजन सिलेंडर, मास्क आणि पिपीई किड्स मोफत भेट दिली. यावेळी पेडणेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापक अजित खैरे यांनी ऑक्सीजन सिलेंडर फिजिशिअयन डॉ. अभिजित चितारी यांच्याकडे हे किट सुपुर्द केले. यामुळे रूग्णांना मोठा आधार मिळाला असून हॉस्पिटल प्रशासनाकडून जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे आभार मानण्यात आले‌. यावेळी पेडणेकर ज्वेलर्सचे सचिन घावरे, हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा