You are currently viewing जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेताळबांबर्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ जल्लोषात पडला पार

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेताळबांबर्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ जल्लोषात पडला पार

वेताळ बांबर्डे, कुडाळ :

मंगळवार दिनांक 24 जानेवारी,2023 रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नंबर एक चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ येथील पटांगणात निमंत्रित मान्यवर, पालक, ग्रामस्थ, प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला.
त्यानिमित्त व्यासपीठावर बाव येथील उद्योजक मा. श्री. एस पी सामंत, सावंतवाडी येथील उद्योजक मा. श्री. शैलेश पै, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी ( प्राथ. योजना विभाग, सिंधुदुर्ग) मा. श्री. प्रदीप कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी मा. श्री. शोभराज शेरलेकर, एकलव्य शिक्षण व आरोग्य न्यास संस्थेच्या संचालिका मा. श्रीमती रेणूताई गावस्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. जे के घाडी, शिक्षणतज्ञ मा. श्री. प्रदीप गावडे, केंद्रप्रमुख मा. श्री. बी. व्ही. तळेकर, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मा. श्री. पी. एस. सावंत, वे. बां. गडकरी शाळेच्या उच्च श्रेणी मुख्या. मा. श्रीमती रश्मी सावंत, पदवीधर शिक्षिका मा. श्रीमती स्नेहल सावंत हे मान्यवर उपस्थित होते.
शा. व्य. स. अध्यक्ष डॉक्टर घाडी यांच्या हस्ते उपस्थित विशेष अतिथींचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शंकर गोसावी यांनी प्रास्ताविक व शैक्षणिक कामकाजाचे अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी मुख्या. श्री. सावंत यांचा श्री. चव्हाण साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शा. व्य. समितीच्या वतीने सरांना सन्मानपत्र देण्यात आले.
श्री चव्हाण साहेब यांनी बोलताना कार्यक्रमातील पालकांच्या उपस्थितीबाबत आनंद व्यक्त केला तसेच मराठी शाळा आपला दर्ज

प्रतिक्रिया व्यक्त करा