You are currently viewing केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन 2 योजनेत खा. विनायक राऊत यांनी लुडबुड करू नये – स्वदेश दर्शन योजना सदस्य विष्णू मोंडकर

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन 2 योजनेत खा. विनायक राऊत यांनी लुडबुड करू नये – स्वदेश दर्शन योजना सदस्य विष्णू मोंडकर

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन 2 योजनेत खा. विनायक राऊत यांनी लुडबुड करू नये – स्वदेश दर्शन योजना सदस्य विष्णू मोंडकर

मालवण

खा. विनायक राऊत प्रत्येक राजकीय भाषणात स्वदेश दर्शन 2 योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आणून जिल्ह्यात पर्यटनातून रोजगार निर्मिती करेन असे सांगत फिरत आहेत. वास्तविक त्यांनी अशा प्रकारे बोलत असताना योजनेची माहिती घेऊन बोलणे गरजेचे आहे. सदर योजनेची केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे राज्य सरकारने स्वदेश दर्शन 2 साठी कमिटी गठीत केली असून कमिटीचे जिह्यात नियोजन बद्ध काम सुरु आहे. त्यामुळे या योजना स्थानिक प्रशासन स्थानिक नागरिक यांना सोबत घेऊन राबविण्यासाठी आम्ही सदस्य सक्षम असल्याचे मत स्वदेश दर्शन 2 सदस्य श्री विष्णु मोंडकर यांनी सांगितले.

या विषयात खा. राऊत यांनी लुडबुड किंवा हस्तक्षेप करू नये सदर योजना केंद्र सरकार मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष अंबलबजावणी साठी सुरवात झाली असून या माध्यमातून स्थानिकांना अपेक्षित कामही सुरु झाल्याची माहिती विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेव्ही डे यशस्वी रित्या पार पडला. त्याच वेळी राजकोट किल्ल्याचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला हा संम्मान निच्छितच अभिमानास्पद आहे. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हाचे जागतिक पातळीवर पर्यटन पोचवून त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्यात शाश्वत पर्यटन व्यवसाय उभा होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केंद्र सरकार कडून स्वदेश दर्शन 2.0 साठी करण्यात आली असून पंतप्रधान यांनी या माध्यमातून जिल्ह्याला राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, पर्यटन केंद्र बनण्याच्या दृष्टीने उचलले पाऊल जिल्ह्यातील जनतेला आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग मोकळा करणारे आहे.

केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर योजना स्वदेश 2.0 या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्याच्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली आहे. या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रीसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी स्थानिक सोयी सुविधा, निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी व्यावसायिकांची कार्यशाळा न्याहरी निवास सर्वेक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील तालूका स्तरावरील गावा गावात राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय स्वकर्तृत्वावर उभा केला असून ह्या भागात पर्यटन व्यवसाय बहरतं आहे. जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सागरी पर्यटना बरोबर जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी काम चालू असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा