कुडाळ (प्रतिनिधी) : हुमरमळा वालावल गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिक होत असताना विकासाच्या कामांमध्ये आघाडीवर असताना तसा शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव आले पाहिजे असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केले.
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत व कोकण कला शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज हुमरमळा वालावल गावातील दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले, हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असुन आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते तसे गावातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गावचे नाव पुढे आले पाहिजे असे सांगुन बंगे म्हणाले. हुमरमळा वालावल गावातील विद्यार्थी अतिशय हुशार असल्याने दरवर्षीच चांगल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत असताना यामध्ये पालक आणि शिक्षक यांची तेवढीच मेहनत आहे. माझ्या गावातील कोणीही विद्यार्थी शैक्षणिक अडचण असेल तर त्यासाठी आपण आहे याची ग्वाही श्री बंगे यांनी देऊन हुमरमळा वालावल ग्रामपंचायत दरवर्षी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा गुणगौरव सोहळा आयोजित करुन तुम्हाला प्रोत्साहन देत असते म्हणून विशेष करुन ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक आहे असेही श्री बंगे म्हणाले.
यावेळी कोकण कला व शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थी वर्गाला ग्रामपंचायतीकडुन मार्गदर्शन प्रा नारायण परब यांनी केले तसेच सरपंच श्री अमृत देसाई यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन ग्रामपंचायत अधिकारी श्रीम अपर्णा सचिन पाटील यांनी केले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शिर्के, शैलेश मयेकर, अमित बंगे, जाई कद्रेकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.