You are currently viewing तिसऱ्या लाटेत नव्या स्ट्रेनची मुलांना बाधा होऊ नये म्हणून डाॅक्टरांची टिम तयार करा …..

तिसऱ्या लाटेत नव्या स्ट्रेनची मुलांना बाधा होऊ नये म्हणून डाॅक्टरांची टिम तयार करा …..

मनसे सचिव आकाश परब.

वैज्ञानिकांनी दावा केल्याप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट येत्या 10 जून पर्यंत संपेल. पण त्याच बरोबर तिसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा घातक आणि दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. आणि त्याच बरोबर आता या नव्या स्ट्रेन मध्ये 18 वर्षाखालील लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण दगावण्याचे प्रमाण हे संपूर्ण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. परंतु आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संरक्षित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची आधीच एक टीम तयार करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. प्रत्येक तालुक्यात एक टीम तयार करून प्रत्येकाच्या घरी जाऊन लहान मुलांची आरोग्य तपासणी करावी जेणेकरून आजार घातक रूप घेऊ शकणार नाही. प्रत्येक सिंधुदुर्ग वासियांच्या मुलांची आणि त्यांच्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य सरकारची आहे. त्यामुळे तातडीने आधीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी मनसे सचिव आकाश परब यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 14 =