माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती कणकवली शिवसेना शाखेत साजरी

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती कणकवली शिवसेना शाखेत साजरी

कणकवली

तमाम शिवसैनिकांची माऊली, वात्सल्यमूर्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती आज कणकवली शिवसेना शाखेत साजरी करण्यात आली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख राजू राणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, कळसुली विभागप्रमुख ,वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, महिला शहरप्रमुख साक्षी आमडोस्कर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, बांधकरवाडी शाखाप्रमुख संजना साटम, स्वीय सहाय्यक नितीन राऊळ, विलास गुडेकर, शरद सरंगले, श्री. राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा