You are currently viewing आम. नितेश राणे यांची आंबा बागायतदारांच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा

आम. नितेश राणे यांची आंबा बागायतदारांच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा

नुकसान भरपाई, विमा व इतर गोष्टींमध्ये शासन धोरणात बदल करा

 

कणकवली :

फळांचा राजा आंब्याला संकटातून बाहेर काढा आणि आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हमी भाव द्या.आंबा बागायतदारांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, विमा व इतर गोष्टींमध्ये शासन धोरणामध्ये अमुलाग्र बदल करा. फळमाशीला रोखण्यासाठी योग्य प्रकारचे ट्रॅप द्या. अशा अनेक मागण्या आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात लावून धरल्या.आंबा बागातदारांच्या सर्वच प्रश्नांवर अधिवेशनात सविस्तर चर्चा केली.

अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना आमदार नितेश राणे यांनी ही मागणी विधानसभेत केली. आमदार नितेश राणे म्हणाले की फळांचा राजा म्हणून आंब्याला ओळखतो मात्र या राजाची अवस्था अत्यंत वाईट आहे.२५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले. या कालावधीत तापमान ३५ ते ३९ डिग्री तापमान होते.आता केवळ दहा टक्केच आंबा पिक उरले आहे. आंबा बागायतदारास योग्य दर मिळत नसून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दलाल जाणीवपूर्वक पडत आहेत.

कोकणातील आंबा बागायतदारांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, विमा व इतर गोष्टींमध्ये बदल होणे गरजेचे आहे.असेही आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सांगितले. आमदार नितेश राणे यांनी यावेळी शासन धोरणामध्ये बदल करा अशी मागणी करून पुढील बदल सुचवले आहेत.

फळपीक विमा योजनेची कालावधी १ ऑक्टोबर पासून ६ जून पर्यंत असावी.विम्यामध्ये उल्लेख केलेले किमान तापमान हे 12 सेल्सिअस ऐवजी 17 सेल्सिअस असावे.शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्यांची दखल शासनाने घेतली पाहिजे. तसेच येणारा अवकाळी पाऊस त्याच्यामुळे काळा पडणारा मोहोर याबाबतही सरकार दरबारी दखल घेतली जावी,शेवटच्या टप्प्यापर्यंत आंबा पिकाला हमीभावाची गरज आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला आंबा याबाबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर पंचनामे होऊन फवारणीसाठी होणाऱ्या ज्यादा खर्चाचा समावेश या नुकसान भरपाईत करण्यात यावा.धुक्याचा समावेशही नुकसान भरपाई करण्यात यावा. फळमाशी मुळे यंदा फार मोठे नुकसान झाले. यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यात यावा.फळमाशीच्या ट्रॅप देण्याबाबत तरतूद करण्यात आली मात्र त्याची कार्यवाही झालेली दिसत नाही. कृषी विद्यापीठ जे ट्रॅप बनवते त्याची किंमत अडीचशे रुपये आहे व ती शेतकऱ्यांना परवडत नाही मात्र कोल्ड्रिंकच्या बॉटल वापरून शेतकरी ट्रॅप बनवतात ते ट्रॅप दहा रुपयात बनतात यामुळे या किमती बाबतही विचार करणे गरजेचे आहे.

वेदर स्टेशन वरून येणारी आकडेवारी ही बहुतांशी चुकीची असते याबाबतही विचार होणे गरजेचे असते. कोकण कृषी विद्यापीठामध्ये असलेले अशासकीय सदस्य हे कोकणच्या बाहेरचे असून ते शेतकरीही नाहीत याबाबत काय बदल करू शकतो याचा विचार सरकारने करावा.यानिमित्ताने बोलताना आमदार नितेश राणे यांनी फळांचा राजा आंबा असलेल्या त्याच्या उत्पादकांना संकटातून बाहेर काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =