You are currently viewing आशा वर्कर्स युनियनचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; विविध मागण्यांचे दिले निवेदन

आशा वर्कर्स युनियनचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; विविध मागण्यांचे दिले निवेदन

ओरोस

आशा कर्मचारी आणि गट प्रवर्तकांना आरोग्य सेवक म्हणून सेवेत कायम करावे त्यांना २६ ते २८ हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनाच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढण्यात आला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सादर करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा. व आशाना दरमहा किमान २६ हजार रुपये व गटप्रवर्तक यांना दरमहा किमान २८ हजार रुपये मानधन मिळावे, आशा व गटप्रवर्तकांना नियमित रजा, ग्रॅच्युईटी व अनुषंगिक लाभ मिळावेत, ४५ व्या व ४६ व्या भारतीय श्रम संमेलनाच्या शिफारशी लागू कराव्यात तसेच राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांशी लवकरात लवकर चर्चा करून त्यांना न्याय द्यावा या मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी ते जिल्हा परिषद भवन असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आशा युनियच्या जिल्हाध्यक्षा कॉ. प्रियांका तावडे, सचिव कॉ. विजयाराणी पाटील, नम्रता वळंजू, अर्चना धुरी, वर्षा परब आदी ५०० आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

संपला सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनचा पाठिंबा
सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनने जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढल्यानंतर या संघटनेनं संपा सध्या चालू असलेल्या राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास पाठिंबा दिला. तसेच या संपाबाबत लवकरच शासनाने तोडगा न काढल्यास आपली संघटनाही संपात सहभागी होणार असल्याचे सिटू संघटनेचे सचिव प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी यावेळी जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =