You are currently viewing कुडाळ बाजारपेठेत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी “वन वे” सुरू करण्याचा निर्णय

कुडाळ बाजारपेठेत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी “वन वे” सुरू करण्याचा निर्णय

आमदार वैभव नाईक यांच्या कडून पाहणी..

 

कुडाळ :

शहरातील बाजारपेठ निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता गांधी चौक ते पानबाजार या रस्त्यावर “वन वे” सुरू करण्याचा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी वाहतूक शाखा आणि पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्याची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती कुडाळचे शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाठ यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे “वन वे” सुरू करण्यात यावा, अशी मागणी व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्याकडून सुरू आहे ही मागणी लक्षात घेता आज आमदार वैभव नाईक यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी युवा शहराध्यक्ष चेतन पडते, वृजेश शिरसाट, प्रशांत शिरसाट, दिलीप शिरसाट आदी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 7 =