You are currently viewing मॉडेल मेकिंग स्पर्धेत कळसुलीचा रुद्र शिवाजी गुरव झोनल स्तरावर प्रथम

मॉडेल मेकिंग स्पर्धेत कळसुलीचा रुद्र शिवाजी गुरव झोनल स्तरावर प्रथम

मॉडेल मेकिंग स्पर्धेत कळसुलीचा रुद्र शिवाजी गुरव झोनल स्तरावर प्रथम

कणकवली

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट प्रशालेमधील इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. रुद्र शिवाजी गुरव याने मुंबई नेरूळ येथे नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच 9 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथे नॅशनल स्तरावर होणाऱ्या स्टेम प्रोग्रॅम साठी त्याची निवड झाली.

नॅशनल स्टेम प्रोग्रॅमही एक कंपनी असून तिच्या मार्फत मिनी सायन्स सेंटर मधील उपकरणे, प्रोजेक्ट तयार करण्यात आलेले आहेत. या कंपनीमार्फत मिनी सायन्स सेंटर असणाऱ्या शाळा मधून मॉडेल मेकिंग स्पर्धा आयोजित केली जाते.यशस्वी विद्यार्थी आणि त्याला मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री.चव्हाण सर आणि मुख्याध्यापक व्ही.व्ही. वगरे यांचे संस्था पदाधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक-पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी तसेच समस्त ग्रामस्थ, पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − three =