You are currently viewing माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची करडी नजर

माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची करडी नजर

*माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची करडी नजर*

*संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सव सुरू झाल्यापासून जत्रोत्सवातील जुगारांना मोठी गर्दी होऊ लागली आहे. प्रत्येक जत्रोत्सवात जिल्ह्यातील मोठमोठे जुगारी जुगाराच्या मैफिली सजवतात आणि त्यांना पाठबळ मिळते आहे ते त्या त्या भागातील खाकी वर्दीचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांमध्ये बसणारे जुगाराचे पट आणि त्या मागील सूत्रधार यांच्या बद्दल सविस्तर माहिती संवाद मीडियाने प्रसिद्ध केली होती. संवाद मीडियाच्या बातमीनंतर माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवांमध्ये बसणाऱ्या जुगारांवर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे.
काल माणगाव खोऱ्यातील वाडोस येथे असलेल्या जत्रोत्सवामध्ये जुगाऱ्यांनी आपली पाले टाकली होती. परंतु वेळीच पोलिसांनी वाडोस जत्रोत्सवातील जुगारांवर धाड टाकल्याने जुगार खेळणाऱ्या खेळींची पळापळ झाली आणि जत्रोत्सवातील जुगार बंद पडले. कांदोली येथील जत्रेत “दोन”नाथ कोई आणि एका खाकी वर्दीच्या शिलेदाराने जुगारांवर धाड टाकली होती. या धाडीनंतर जुगार बंद होण्याऐवजी तब्बल 35 हजार रुपयांची मांडवली झाली आणि कोई यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा खुलेआम जुगाराची मैफिल सजली होती. आज मोऱ्या गावची प्रसिद्ध जत्रा असून या जत्रोत्सवात देखील जुगार बसण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. परंतु संवाद मीडियाच्या बातमीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवांवर असलेली करडी नजर मोऱ्या गावच्या जत्रेत जुगाराचे फड बसू देतात की जुगाऱ्यांना पळवून लावतात..? हे लवकरच समजून येईल.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा