You are currently viewing यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या स्वधा महाजनचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या स्वधा महाजनचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या CBSE गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा, तर सावंतवाडी तालुक्यात २ रा क्रमांक

सावंतवाडी :

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वधा धनंजय महाजन हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सीबीएसई गुणवत्ता यादीत स्वधाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा क्रमांक तसेच सावंतवाडी तालुक्यात २ रा क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

स्वधाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा