You are currently viewing शिरवल रतांबेवाडी कळसुली गवसेवाडी गावडेवाडी या नविन लोकवस्तीच्यामार्गाने आंब्रड कुंदे कसाल जाणारी एसटी सेवा सुरू करावी –  सुशांत दळवी

शिरवल रतांबेवाडी कळसुली गवसेवाडी गावडेवाडी या नविन लोकवस्तीच्यामार्गाने आंब्रड कुंदे कसाल जाणारी एसटी सेवा सुरू करावी –  सुशांत दळवी

कणकवली

शिरवल व कळसुली या दोन गावात सदरचा रस्ता ग्राम सडक योजनेतून नवीन बनवलेला आहे. तरी सद्यस्थितीत संबंधित रस्त्याच्या विभागाने सदर रस्त्यावरून एसटी वाहतूक सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्र ही दिलेले आहे तरी आपण आपल्या अधिकार्‍यांमार्फत या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर या रस्त्याचा वापर येथे राहणाऱ्या लोकांना एसटी च्या माध्यमातून करावा ही विनंती . यावर लवकरच पाहणी करून एसटी सेवा सुरू करू असे आश्वासन मिळाले. सोबत गावातील लोकांच्या सह्यांचे निवेदन व इतर तांत्रिक कागदपत्रे , पंचायत ठराव एसटी विभाग नियंत्रक अधिकारी श्री. रसाळ साहेब यांना देण्यात आले यावेळी शिवसेनेचे कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत चंद्रकांत देसाई, संजय किर्तने ,विजय सावंत ,चंद्रकांत चव्हाण, मंगेश दळवी, जयेंद्र देसाई, सिताराम नार्वेकर ,गणेश पाडावे ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा