“महा अवास अभियान – ग्रामीण” अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-गृहप्रवेश

“महा अवास अभियान – ग्रामीण” अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-गृहप्रवेश

सिंधुदुर्गनगरी

“महा आवास अभियान – ग्रामीण” अंतर्गत घरकूल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या दि. 15 जून 2021 रोजी सायं. 4.30 वा. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे.

            केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण तसेच इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांना गतिमानता देणे व त्यास गुणवत्ता आणण्याच्या उद्देशाने 20 नेव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत “महा आवास अभियान – ग्रामीण” राबविण्यात आले आहे.        या अभियानाच्या कालावधीत घरकूल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी 4 ते 5 लाभार्थींना प्राथमिक स्वरुपात घरकुलांची चावी देण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा