You are currently viewing मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या

मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या

कणकवली तालुका पत्रकार समितीच्या वतीने सरकारकडे मागणी; तहसीलदार आर. जे. पवार यांचे कडे दिले निवेदन

कणकवली

कोकणची लाइफलाइन असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशी मागणी तालुका पत्रकार समितीच्या वतीने तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली. पत्रकारांनी सातत्याने सहा वर्षे रस्त्यावर उतरून लढा दिल्यानंतर आणि दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. काम रखडल्यानंतर देखील; वेळोवेळी पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. आता रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना काहींनी महामार्गासाठी वेगवेगळी नावं देण्याची मागणी करत आहेत.

बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत; आणि पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने; बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई सचिव संजय राणे, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे पत्रकार समितीचे माजी तालुकाध्यक्ष संतोष राऊळ, भगवान लोके, तालुका पत्रकार समितीचे माजी सचिव नितीन सावंत, स्वप्नील वरवडेकर, संजय पेटकर, उमेश बुचडे इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा