You are currently viewing २१ व २२ मार्च ला काढणार राष्ट्रीय महामार्ग विभाग बांदा महामार्गावरील अतिक्रमण

२१ व २२ मार्च ला काढणार राष्ट्रीय महामार्ग विभाग बांदा महामार्गावरील अतिक्रमण

सिंधुदुर्ग :

 

उप अभियंता महेश खटीमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा वरील बांदा कट्टा कॉर्नर येथे ८० कोटीचे उड्डाणं पूल प्रस्तावित आहे. याचे कामं लवकरच सुरु करायचे होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेकेदार कंपनीकडून सर्वे करून महामार्गच्या मद्यबिंदूपासून २२.५ मिटर प्रमाणे जमिनीचे अधिग्रहण केलेले होते व गाळे धारकाना संपादित जमिनीतील अतिक्रमण स्वतः खाली करण्या बाबत नोटीसा बजावल्या होत्या. परंतु काही लोकांकडून सदरच्या अधिग्रहणास विरोध झाल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने भूमी अभिलेख कार्यालया मार्फत सर्वे करण्याचा निर्णय घेतला. त्या नुसार भूमी अभिलेख कार्यालयाने ९१ च्या नकाशा नुसार दि. २७ व २८ फेब्रुवारीला सर्वे करून पुन्हा एक त १० मार्च तारीख घेऊन त्या दिवशी हद्द निश्चित केली आहे. त्यानुसार येत्या २१ व २२ मार्च मंगळवार व बुधवारी संपादित जमिनीतील अतिक्रमण काढणार आहे. सर्व अतिक्रमण ग्रस्त गाळे धारकानी तत्पूर्वी स्वतः म्हणून अतिक्रमण काढून शासनास सहकार्य करावे व आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन सहकार्य करावे असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता महेश खटी यांनी आव्हान केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − ten =