You are currently viewing कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन

कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन

कणकवली :

 

कणकवली येथील शिवाजी चौकात माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने ७ एप्रिल ते १० एप्रिल २०२३ दरम्यान दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ७ एप्रिल रात्रौ ६ वाजता आम्ही लाल परी निर्मित विलास खानोलकर लिखित, गणपत घाणेकर आणि सहा. दिग्दर्शक सुहास वरुणकर दिग्दर्शित दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो, ८ एप्रिल रोजी सायं. ६ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचे रक्तजल डोहाळे, रात्रौ ९ वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे अर्धशिरा, ९ एप्रिल सायं. ६ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांचे वरुण देव गर्वहरण, रात्रौ ९ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचे कृष्ण पूजन, १० एप्रिल रोजी सायं. ६ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचे बालभूवनेश्वर, रात्रौ ९ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ यांचे कुर्मादासाची वारी या दशावतारी नाट्य प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाची माहिती आयोजकांकडून सांगण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =