You are currently viewing विक्रांत सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन

विक्रांत सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन

सावंतवाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे युवा नेते आणि विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांचा आज वाढदिवस. सावंतवाडीतील शिवसेनेचा युवा चेहरा आणि हरहुन्नरी नेतृत्व असलेले विक्रांत सावंत हे सावंतवाडीच्या आमदारकीचे भावी आमदार म्हणून ओळखले जातात. सावंतवाडी मतदारसंघात युवकांची फळी उभी करून संकटकाळात गावागावात फिरून त्यांनी लोकांना मदतीचा हात दिला आहे. वादळ, पाऊस असो वा कोरोनाचे संकट, विक्रांत सावंत सर्वप्रथम मदतीला धावून जातात.
खासदार विनायक राऊत यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध त्यांना वेळोवेळी फायद्याचे ठरतात. मतदारसंघात धान्य वाटप असो, कुणाच्या पडलेल्या घरास मदत असो वा आशाताइंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचा सत्कार असो, विक्रांत सावंत नेहमीच आघाडीवर असतात. आशाताईंच्या सत्कारांमुळे त्यांना देखील काम करण्यास प्रोत्साहन मिळाले होते आणि त्यांची दखल घेतल्याने कित्येकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उठली होती.
सर्वसामान्य जनतेशी अदबीने बोलणारा, माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचा नातू आणि माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांचा पुत्र असूनही कोणताही बडेजाव न ठेवता गोरगरिबांच्या सदैव पाठीशी असणारे विक्रांत सावंत हे शिवसेनेचे युवा नेते…..
आज विक्रांत सावंत यांचा वाढदिवस, संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या तसेच भावी राजकीय सामाजिक वाटचालीस शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =