You are currently viewing जमलंच कधी तर…

जमलंच कधी तर…

जमलंच कधी तर…
स्वतःशी एकदा बोलून बघा,
स्वतःच्या मनात काय चाललंय
ते हि मनाला विचारून बघा,

जमलंच कधी तर…
थोडं भावनिक होऊन बघा,
स्वतःची सर्व दुःख
मात्र एकाच घोटात
बुडासहित पिऊन बघा,

जमलंच कधी तर…
दुःखही सुखा सारखे
हसत हसत जगून बघा,
दुःखावरही मात करून
सुखाची अनुभूती घेऊन बघा,

जमलंच कधी तर…
गोरगरिबांच्या विश्वात
फेरफटका मारून बघा,
दिनदुबळ जीवन त्यांचं
एक दिवस सोबत राहून बघा,

जमलंच कधी तर…
स्वतःची दिशा बदलून बघा,
जनांच्या मागे धावण्यापेक्षा
मनाच्या मागे हळूच
एकदा तरी पळून बघा,

जमलंच कधी तर…
स्वप्नांवर जगणाऱ्या त्या
नजरेस नजर भिडवून बघा,
डबडबलेल्या डोळ्यांत त्यांच्या
फक्त एकदा उतरून बघा,

जमलंच कधी तर
‘मित्रा’ म्हणून हक्काने
एक हाक मारून बघा,
मैत्रीचा हात पुढे करून
फक्त एकदाच…
मनात शिरून बघा…!

दिपी…!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 11 =