You are currently viewing साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त निरवडेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त निरवडेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी :

 

निरवडे झरबाजार येथे साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळातर्फे गुरुवार ९ ते ११ मार्च रोजी साटम महाराजांच्या ८६ व्या पुणियतिथीनिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्चला सकाळी ८ वाजता मूर्तिपूजन व पादूका पूजन, १२ वाजता आरती, १२.३० वाजता तीर्थप्रसाद, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती, सायंकाळी ७ वाजता बुवा सुंदर मेस्री (कसाल), बुवा चिन्मय सावंत (कणकवली) या भजनी बुवांचा जुगलबंदी कार्यक्रम, १० मार्चला सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ८ वाजता (सिंधुदुर्ग गोवा राज्य) खुली रेकॅार्ड डान्स स्पर्धा प्रथम पारितोषिक ७०२३ रुपये व चषक, व्दितीय पारितोषिक ५०२३ रुपये व चषक ११ मार्चला सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ८ वाजता लिलाव, रात्री ९ वाजता संयुक्त दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘वीर बब्रुवाहन’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + nine =