You are currently viewing १३ फेब्रुवारी ला करुळ येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

१३ फेब्रुवारी ला करुळ येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी:

 

करुळ येथे माघी गणेश जयंती निमित्त मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. रामेश्वर युवा मित्र मंडळ करुळ (भोयेडेवाडी) यांच्या वतीने यानिमित्त राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार आहे. यानिमित्त मंगळवार दिनांक १३ रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता महाआरती, सकाळी ९ वाजता पालखी मिरवणूक, सकाळी ९.३० वाजता सत्यानारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता सुस्वर भजने, रात्री ८ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता राज्यस्तरीय ढोल पथक स्पर्धा, स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रुपये १० हजार व आकर्षक सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास रु. ५ हजार व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार व सन्मानचिन्ह, उत्तेजणार्थ रोख रु. २ हजार, उत्कृष्ठ ढोलवादक, उत्कृष्ठ ताशावादक, उत्कृष्ठ झांजवादक, (प्रत्येकी रोख रु.५०१/- व सन्मानचिन्ह), देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी रु. ५००/- रोख/ऑनलाईन स्वीकारण्यात येईल. प्रथम दहा येणा-या ढोल पथक स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतील पथकांनी त्वरित नोंदणी करावी.

तसेच मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे. बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण व श्री. रामेश्वर युवा मित्र मंडळ भोयडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात विशेष तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये हर्निया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, महिलांची गर्भाशय तपासणी, अल्सर, थायरॉईड, स्तनाचा कॅन्सर, मुळव्याध, मुतखडा व इतर जनरल आजाराची तपासणी करण्यात येणार आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया अल्पदरात होणार आहे. या शिबिराला येताना नागरिकांनी रेशन कार्ड, ओळखपत्र व जुने तपासणी रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक आहे. तरी या शिबिराचा लाभ करूळ गावातील नागरिकांनी तसेच तालुक्यातील इतर गावातील नागरिकांनी घ्यावा. या कार्यक्रमाला व यात्रेला भाविक व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हिंदुराव पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =