You are currently viewing पिकुळे ग्रामपंचायत सरपंच पदास संजय गवस यांची प्रचारात आघाडी

पिकुळे ग्रामपंचायत सरपंच पदास संजय गवस यांची प्रचारात आघाडी

दोडामार्ग

पिकुळे ग्रामपंचायत सरपंच पदास श्री देवी सातेरी केळबाय उत्कर्ष परिवर्तन पँनेलचे उमेदवार संजय कृष्णा गवस यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पिकुळे गावात त्यांना जनतेचा मोठा पांठिबा मिळत आहे. गेली २० वर्षे राजकारणातील अनुभव तथा दोडामार्ग तालुक्यातील केलेली अनेक विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहेत. पिकुळे गावात गेली 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा डोंगरी विभाग सदस्य म्हणून पिकुळे गावात खासदार निधी, जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून करोडो रुपयाची विकासकामे केली. सद्यस्थितीत शिवसेना ठाकरे गट दोडामार्ग तालुकाप्रमुख पदी कार्यरत आहेत. दोडामार्ग तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्हा डोंगरी विभाग सदस्य म्हणून हायस्मार्ट, निवारा शेड, रस्ते, स्ट्रीटलाईट साठी निधी दिला. सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर, जनसामान्यांना न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी सातत्याने न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करतात. पिकुळे गावाचा सर्वागीण विकास व्हावा या हेतुने थेट सरपंच पदी *अंगठी* ह्या निशाणीसह निवडणूक रिंगणात असून जनतेचा प्रचारात मोठा पांठिबा मिळत आहे. प्रचारात आघाडी घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + three =