You are currently viewing नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला कुडाळमध्ये शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीने केला विरोध

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला कुडाळमध्ये शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीने केला विरोध

*नारायण राणेंच्या समक्षच शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी*

कुडाळ :

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळ शहरात दाखल झाल्यानंतर, ही यात्रा येथील शिवसेना शाखेसमोरून जात असताना शिवसेना शाखेसमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. आवाज कुणाचा शिवसेनेचा, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर आरोप झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री साडे नऊ वाजता कुडाळ शिवसेना शाखेसमोरून जात असताना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीने जन आशीर्वाद यात्रेला विरोध केला.

जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंचा विजय असो, आ. वैभव नाईक अंगार है, बाकी सब भंगार है, खासदार विनायक राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आमदार वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी नारायण राणेंच्या समोरच शिवसैनिकांनी केली.

यावेळी उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, संतोष शिरसाट, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, सचिन काळप, बाळा पावसकर, चेतन पडते, कृष्णा तेली, गोट्या चव्हाण, कृष्णा तेली, कृष्णा धुरी, योगेश धुरी, रूपेश पावसकर, राजू गवंडे, सुशिल चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, नितीन सावंत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा