You are currently viewing गोवेरीमध्ये वाघिणींकडून शेळी फस्त

गोवेरीमध्ये वाघिणींकडून शेळी फस्त

 वाघिणीचा बंदोबस्त करा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांची मागणी

कुडाळ / पूनम राटुळ :
आज संध्याकाळी दिवसाढवळ्या ५ वाजता गोवेरी भगतवाडी येथील श्रीधर शंकर पालकर यांची सुमारे १० हजार किंमतीची शेळी वाघिणीने फस्त केल्याने गोवेरी,भगतवाडी, वायंगणी येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच शेळीसोबतच इतर जनावरेही तेथे होती.

हि घटना समजताच माजी जि .प.अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेनेचे कार्यकर्ते शोएब खुल्ली, माजी ग्रा.प.सदस्य सत्यवान हरमळकर यांनी भगतवाडी येथे धाव घेतली व वनखात्याचे अधिकारी शिंदे यांना कळवले. त्यांनी तात्काळ सूर्यकांत सावंत यांना घटनास्थळी पाठवले व वस्तुस्थिती जाणून घेतली.

माजी जि.प. अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी पालकर यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करणार असल्याचे सांगत सूर्यकांत सावंत यांना या वाघिणीचा त्वरीत बंदोबस्त करण्यास सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 11 =