You are currently viewing देवगड येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन…

देवगड येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन…

देवगड

येथील रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी आणि डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर उद्या सकाळी ९:०० ते १:०० यावेळेत संपन्न होणार आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी तर्फे करण्यात येत आहे.
या शिबिराची वैषीट्य म्हणजे,
कॉम्पुटरद्वारे अचूक चष्मा नंबर व मोतीबिंदू निदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात,
सवालतीच्या दरात चष्मे वाटप केले जातील. सदर शिबीर हे डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, सातपायरी, देवगड येथे घेण्यात येईल. तरी अधिक माहितीसाठी रो. दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा