You are currently viewing कारिवडे गावातील प्राथमिक शाळा नं. 1 येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर संपन्न..

कारिवडे गावातील प्राथमिक शाळा नं. 1 येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर संपन्न..

सावंतवाडी :

 

आय टी आय सावंतवाडीतील राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर दिनांक 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी कालावधीत कारिवडे गावातील प्राथमिक शाळा नंबर 1 येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन माननीय सरपंच सौ माळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच गावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक माळकर, तळवणेकर, ग्रामविकास अधिकारी श्री बुंधे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री उमेश गावकर, बाबा गावकर, रवी गावकर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आय टी आय सावंतवाडीतील निर्देशक, कर्मचारी आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री मोहारे उपस्थित होते.  शिबिरात प्रशिक्षणार्थीनीं शाळांची लाईट फिटींग दुरुस्ती, नवीन प्लंबीग, दुरुस्ती,खेळाचे साहित्य दुरुस्ती, रंगवने, शाळेच्या भिंतीवर शैक्षणिक साहित्य, रंगवणे, दारे खिडख्या दुरुस्ती, फर्निचर दुरुस्ती, अंगणवाडी प्लंबीग वर्क, ग्रामपंचायत दारे खिडक्या, फर्निचर दुरुस्ती, शाळा परिसरातिल झाडांना पाणी घालण्यासाठी अळी /बांध तयार केले, देव हेळेकर देवस्थान परिसर स्वच्छता केली संत गाडगे बाबा जयंती साजरी केली.

गावातील महिलांसाठी बेसिक फॅशन डिझाईन कोर्स सौ ढवण यांनी घेतला. श्री उमेश कुलकर्णी ऐतिहासिक कथा, श्री नाटेकर स्वच्छता निरीक्षक नगरपालिका सावंतवाडी यांनी व श्री निवेद कांबळे यांनी घनकचरा व्यवस्थाप याविषयी मार्गदर्शन केले. प्राध्यापक नारायण परब यांनी मुलांना मनाच्या अवस्था, स्पर्धा परीक्षा याविषयीचे मार्गदर्शन केले. शेवटच्या दिवशी शिबीर समारोप दिवशी कार्यक्रम अध्यक्ष श्री उमेश गावकर तर प्रमुख पाहुणे व वक्ते प्राध्यापक श्री परब, सामाजिक कार्यकर्ते श्री तळवणेकर, श्री बाबा गावकर, श्री गावकर, श्री माळकर साहेब, श्री परब आय टी आय सावंतवाडी, प्राचार्य पिंडकुरवार, मुख्याध्यापक पास्ते मॅडम, चव्हाण आणि कार्यक्रम अधिकारी रामचंद्र जाधव यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी, आय टी आय चे दाभोलकर, नर्तवडेकर, तांडेल, सावंत, कदम, तामाणेकर, गोरे, कोदे, भोसले, श्री वेंगुर्लेकर, श्री गवळी, आणि कार्यक्रम अधिकारी श्री रामचंद्र जाधव व श्री मधुकर परब यांनी कामकाज केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =