म्हापण १२ ते १७ जून पर्यंत बंद

म्हापण १२ ते १७ जून पर्यंत बंद

वेंगुर्ला :

म्हापण गावातील कोरोना पेशंटची संख्या वाढत चालली असुन परीस्थिती चिंताजनक होत आहे. यावर वेळीच कठोर पावले उचलून नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. याबाबत गावस्तरीय संनियंत्रण समिती अध्यक्ष यांनी गावातील नागरीक, व्यापारी वर्ग, खाजगी डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा केल्यावर काही दिवसांचा कडक निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे सर्वांचे मत झाले आहे. त्यानुसार शनिवार दि. १२ ते गुरुवार दि. १७ जुन २०२१ या कालावधीत म्हापण बाजारपेठ व अन्य सार्वजनिक ठिकाणे नागरीकांसाठी पुर्णत: बंद राहातील. यावेळी फक्त आरोग्यसेवा वितरक सेवा सुरु राहातील. या काळात अनावश्यक रीत्या फिरणार्‍या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. तरी सर्व नागरीकांनी या निर्णयास सहकार्य करावे असे,  आवाहन म्हापणचे कोविड नियंत्रण समिती अध्यक्ष यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा