You are currently viewing बनावट दागिन्यांच्या सहाय्याने बँकेत कर्ज उचल प्रकरणी सशर्त जामीन मंजूर

बनावट दागिन्यांच्या सहाय्याने बँकेत कर्ज उचल प्रकरणी सशर्त जामीन मंजूर

ॲड. परशुराम बाबुराव चव्हाण यांचा यशस्वी युक्तिवाद

दि.१२/०१/२०२३ रोजी आरोपी नं. (१) स्नेहा सज्जन नारकर, (२) वैभवी विष्णू पाटील, (३) सौरभ सुभाष गुरव, (४) साई दिलीप कांबळे, (५) वसंतराव धनाजीराव पाटील, (६) चंद्रकांत शिवराम भिंगार्डे, (७) सचिन सुरेश सुतार यांनी दि. १२/०१/२०२३ रोजी १७१ ग्रॅम वजनाचे खोटे सोन्याचे दागिने ठेवून कुडाळ येथील बँकेत बनावट दागिने ठेवून रक्कम रु. ५.३१ लाख मात्र कर्ज घेवून बँकेची फसवणुक केल्याबाबत तसेच दि. २१/०१/२०२३ रोजी १३२ ग्रॅम वजनाच्या बांगड्या व ५० ग्रॅम वजनाच्या दोना चेन असे खोटे सोने तारण करणे असलेबाबत सांगून फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्या म्हणून त्यांचेविरुद्ध गु.र.नं.२०/२०२३ भा.दं.वि. कलम ४१७, ४२०, ३४ प्रमाणे कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविणेत आला. आरोपी नं. ६ व ७ यास दि.०३/०१/२०२३ रोजी अटक करून दि. ०४/०१/२०२३ रोजी मे. कोर्टात हजर करुन न्यायालयीन कोठडीची मागणी करणेत आली. दि.०४/०१/२०२३ रोजी आरोपी नं. ६ व ७ तर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल करून, त्यावर युक्तीवाद केला. आरोपी नं. ६ व ७ तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य मानून त्यांची रक्कम रु. १५,०००/- (रुपये पंधरा हजार मात्र) च्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपी नं. ६ व ७ तर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा