You are currently viewing भोसले नॉलेज सिटीच्या ४० विद्यार्थ्यांची सिप्लामध्ये निवड…

भोसले नॉलेज सिटीच्या ४० विद्यार्थ्यांची सिप्लामध्ये निवड…

_*भोसले नॉलेज सिटीच्या ४० विद्यार्थ्यांची सिप्लामध्ये निवड…*_

*_फार्मसी व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा समावेश.._*

सावंतवाडी –

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची गोवा येथील सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये फार्मसीच्या ३७ व पॉलिटेक्निकच्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे._
_भोसले फार्मसी हे नॅक मान्यताप्राप्त व भोसले पॉलिटेक्निक हे एनबीए मानांकन प्राप्त कॉलेज आहे. सिप्लासोबत दोन्हीही कॉलेजचा सामंजस्य करार झालेला असून गेली चार वर्षे येथील विद्यार्थ्यांना सिप्लामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहे._
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, बी फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा