You are currently viewing उंबर्डे त राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा- शिवसेनेला पाडले खिंडार

उंबर्डे त राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा- शिवसेनेला पाडले खिंडार

उंबर्डे त राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा- शिवसेनेला पाडले खिंडार

युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष नजीर रमदुल्ला यांनी दिला दणका

कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

वैभववाडी :

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल जाधव आणि अल्पसंख्याक सेल चे जिल्हा उपाध्यक्ष नजीर रमदुल्ला यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील मेहबूबनगर येथील भाजपा – शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज दाखल झाले.उंबर्डे गावात भाजपा आणि शिवसेनेची मोठी वोट बँक असलेल्या मेहबूबनगर मध्ये विशाल जाधव आणि नजीर रमदुल्ला यांनी भाजपा- शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली हा दिलेला हा दणका मानला जात आहे. या पक्षप्रवेशवेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली युवक अध्यक्ष नयन गावडे, उंबर्डे गावातील ज्येष्ठ नागरिक कादिर बोबडे, असलम रमदुल, यासीन बोबडे, करीम पाटणकर, रसूल मुकादम, अब्दुल बोबडे, उपस्थित होते.यावेळी शहाबुद्दीन बोबडे, अल्लाउद्दीन नाचरे, मनोज लांजेकर गुलाम मुकादम, मुरात पाटणकर, रमजान सारंग, सोहेल चोचे, अश्रफ पाटणकर, सोहेल रमदुल तनवीर बोबडे आसिफ पाटणकर, सर्वार रमदुल, अनिस बोबडे, महानंद बोबडे, यासीन नाचरे, मोबीन मानाजी, अजीम पाटणकर रसूल मुकादम गुलाम सारंग, इमान पाटणकर, सलीम नाचरे, अमीर बोबडे, मनसुर पाखाली, तरबेज, पाखाली, हर्षद, पाटणकर, अश्फाक रमदुल, रेहान अब्दुल, रमजान फरास, जावेद फरास, सलीम अब्दुल, गुलाम अरबाज पकाली आदी शेकडो युवक कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अनंत पिळणकर यांनी बोलताना सांगितले की, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनीच जोमाने काम करूया. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार , संसद रत्न सुप्रियाताई. यांचे हात बळकट करूया. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये सन्मान केला जाईल. हा राष्ट्रवादी पक्ष आपल्या शरद पवार साहेबांचा असल्याचे ठणकावून सांगितले. कोणी किती बोंबललं तरी राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार साहेबांचा असणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा उल्लेख केला. या पक्षाचं काम करण्यासाठी सर्व पक्ष प्रवेश कर्त्यांना पक्षाचं जोमाने काम करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा