You are currently viewing वेंगुर्ले एस टी आगाराचे चालु असलेले नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे : प्रसन्ना उर्फ बाळु देसाई..

वेंगुर्ले एस टी आगाराचे चालु असलेले नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे : प्रसन्ना उर्फ बाळु देसाई..

वेंगुर्ले एस टी आगाराचे चालु असलेले नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे : प्रसन्ना उर्फ बाळु देसाई..

भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाने आगार प्रमुखांचे लक्ष वेधले…

एस्.टी.चे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांचेकडे संघटनेच्या वतीने तक्रार दाखल..

वेंगुर्ले

वेंगुर्ले आगार व्यवस्थापक श्री राहुल कुंभार यांची आज सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ वेंगुर्ला आगार मार्फत आगारातील विविध प्रश्नानं संदर्भात भेट घेण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा शक्ति संघर्ष कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना ( बाळु) देसाई, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष श्री सुहास गवंडळकर, सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ विभागीय उपाध्यक्ष श्री भरत सिताराम चव्हाण, आगार सचिव श्री दाजी तळवनेकर, आगार उपाध्यक्ष श्री भावू सावळ, विभागीय सहसचिव श्री महादेव भगत, इतर कर्मचारी उपस्थीत होते, आगाराचे सध्यास्थितीतील चालु असलेले नूतनीकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीचे आणी निकृष्ट दर्जाचे असल्याचे आगार व्यवस्थापक यांच्या समोर मांडण्यात आले, तसेच केलेले काम कशा पद्धतीत चुकीचे व निकृष्ट झालेले आहे हे आगार प्रमुखांच्या निदर्शनास आणले.

प्रतिक्रिया व्यक्त करा