You are currently viewing दुसऱ्या वर्गापासून आय ए एस चे प्रशिक्षण रविवार दि 20 .नोव्हेंबरला बक्षीस वितरण

दुसऱ्या वर्गापासून आय ए एस चे प्रशिक्षण रविवार दि 20 .नोव्हेंबरला बक्षीस वितरण

*दुसऱ्या वर्गापासून आय ए एस चे प्रशिक्षण रविवार दि 20 .नोव्हेंबरला बक्षीस वितरण*

अमरावती दि. 17 – दुसऱ्या वर्गापासून आयएएसचे प्रशिक्षण देणाऱ्या जुनिअर आयएएस कॉम्पिटिशन अंतर्गत येत्या रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता लातूरच्या सुप्रसिद्ध दयानंद महाविद्यालयामध्ये सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल यांच्या हस्ते दुसऱ्या वर्गापासून आयएएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या पारितोषिक वितरण समारंभाच्या मुख्य कार्यक्रमाला लातूर जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी श्री रत्नराज जवळेकर शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री जयंत जाधव व मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .दुसऱ्या वर्गापासून आयएएसचे प्रशिक्षण या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद असून या अंतर्गत फक्त एक रुपयामध्ये मुलांना दुसऱ्या वर्गापासून आयएएसचे प्रशिक्षण देण्यात येते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुलांना पुस्तके विनामूल्य पुरविण्यात येतात .त्यांची सराव परीक्षा घेण्यात येते. या उपक्रमाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सर्व सनदी अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली असून हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातील विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतरही राज्यात हा उपक्रम प्रारंभ असून त्या राज्यातूनही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद प्राप्त होत आहे. मिशन आयएएसमध्ये 350 आयएएस आयपीएस आयआरएस अधिकाऱ्यांचा समावेश असून मिशन आयएएस अंतर्गत ठिकठिकाणी ग्रंथालय व अभ्यासिका नाममात्र शुल्कामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत .

महाराष्ट्रात ठिकठिकाणी विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन मिशन आयएएसने आपला आगळावेगळा ठसा महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या जगतात उमटविला आहे. या जूनियर आयएएस कॉम्पिटिशन पारितोषिक वितरण कार्यक्रमाला नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे विनंती या उपक्रमाचे मुख्य संयोजक व संस्कार प्रकाशनाचे प्रकाशक श्री ओमप्रकाश जाधव व जितेश चापसी यांनी केली आहे. प्रकाशनार्थ.प्रा.नरेशचन्द्र काठोळे.संचालक .मिशन IAS.अमरावती.

प्रतिक्रिया व्यक्त करा