You are currently viewing सिंधुदुर्ग ब्राम्हण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सिंधुदुर्ग ब्राम्हण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सावंतवाडी – महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदूर्ग शाखा सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील ब्राह्मण ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी ब्राह्मण मंडळ कडून 10वी, 12 वी ग्रॅज्युएट स्कॉलरशिप मुलांचा महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित गुणगौरव कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. एकूण 23 मुलांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ. मृदुला महाबळ अंबापुरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.महाबळ अंबापुरकर यांनी उपस्थित मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा मंडळ अध्यक्ष राजाराम चिपळूणकर, बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य धोपेश्वर, तालुका अध्यक्ष प्रसाद मराठे, तालुका मंडळाचे उपाध्यक्ष विश्वेश्वर कोळंबेकर, तालुका कार्यवाह सौ अंजली नातू, शिक्षण समिती प्रमुख शिवानंद भिडे व सदस्य तसेच ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा