You are currently viewing अखेर दोडामार्ग तालुक्यातही लॉकडाऊन…

अखेर दोडामार्ग तालुक्यातही लॉकडाऊन…

दोडामार्ग

दोडामार्ग : सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्या पाठोपाठ अखेर संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात ७ ते १५ लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आज घेण्यात आला. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात झालेल्या अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश करतसकर, व्यापारी संघ अध्यक्ष लवु मिरकर यासह सर्व अधिकारी, खातेप्रमुख, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

फक्त मेडिकल स्टोअर व वैद्यकीय दवाखाने वगळता सर्व काही बंद राहणार आहेत. फक्त कृषी अस्थापनांना घरपोच सेवा देण्याची सूट देण्यात आली आहे. बाकी संपूर्ण टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. रस्त्यावर दिसणार त्यांची आरटीपिसीआर टेस्ट होणार आहे. पोलिसांना प्रशासनाच्या कडक सूचना देण्यात आल्या असून कारवाई नको तर घरातच राहण्याच आवाहन प्रशासनाने केलं आहे.

सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्या पाठोपाठ अखेर संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात 7 ते 15 लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आज घेण्यात आला. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात झालेल्या अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,उपसभापती सौ.धनश्री गवस, शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी,पं. स.सदस्य बाबुराव धुरी,माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण,भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,कोनाळ सरपंच पराशर सावंत,साटेली-भेडशी सरपंच लखु खरवत, प्रेमानंद देसाई, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश करतसकर, व्यापारी संघ अध्यक्ष लवु मिरकर यासह सर्व अधिकारी, खातेप्रमुख, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. फक्त मेडिकल स्टोअर व वैद्यकीय दवाखाने वगळता सर्व काही बंद राहणार आहेत. फक्त कृषी अस्थापनांना घरपोच सेवा देण्याची सूट देण्यात आली आहे. बाकी संपूर्ण टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. रस्त्यावर दिसणार त्यांची आरटीपिसीआर टेस्ट होणार आहे. पोलिसांना प्रशासनाच्या कडक सूचना देण्यात आल्या असून कारवाई नको तर घरातच राहण्याच आवाहन प्रशासनाने केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा