You are currently viewing कलमठ ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त

कलमठ ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त

कणकवली :

 

आज १२ मार्च रोजी कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. आयएसओ मानांकन प्रमाणपत्र संस्थेचे सहदेव चव्हाण यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आले.

ग्रामपंचायत कामात सुसूत्रता, कार्यालय दफ्तर वर्गीकरण, सर्व समित्या, कर्मचारी काम वर्गवारी, पार्किंग, शासनाच्या योजना माहिती, दिशा दर्शक, नामफलक अश्या अनेक बाबींच्या पूर्तता करून ग्रामपंचायत स्थापने पासूनचे ५० वर्षाचे सर्व रेकॉर्ड अपडेट करण्यात आले असून त्या रेकॉर्डचे विलगीकरण करणे या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली. यासाठी गेले ६ महिने ग्रामपंचायत काम करत असून सर्व ग्रामपंचायत टीमच्या मेहनतीने हे सर्व शक्य झाले असून या पुढे गावातील सर्व शाळा व अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे संदिप मेस्त्री म्हणाले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून गावाच्या विकासासाठी प्रत्येक घटकावर काम करणार आहोत असे सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + four =