You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर….

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर….

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवारी दि.८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खारेपाटण येथे सकाळी ९.३० वाजता स्वागत करण्यात येणार आहे असल्याची  माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. त्यांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकानिहाय शरद कृषी भवन येथे बैठका होणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

नामदार जयंत पाटील हे रविवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ७.३० वाजता मोटारीने गणपतीपुळे येथून ओरोसच्या दिशेने प्रयाण करतील. सकाळी १०.४५ वाजता ओरोस येथे शासकीय विश्राम ग्रहावर त्यांचे आगमन होईल.

यावेळी सकाळी ९.३० वाजता जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक आणि जिल्हा हा कार्यकारिणी व पदाधिकारी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर कणकवली येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधयक्ष अनंत पिळणकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, युवक सरचिटणीस देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, सुनंदार पारकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधाकर कर्ले, तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी त्यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने स्वागत करतील.

ओरोस येथे आगमन झाल्यावर नामदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता शरद कृषी भवन येथे पक्षाच्या तालुकानिहाय बैठका होणार आहेत. यावेळी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करताना तालुक्याचे प्रश्न व विकासाची स्थितीही समजून घेणार आहेत.

सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुका, ११.३० वाजता कुडाळ तालुका, दुपारी १२ वाजता वेंगुर्ला तालुका, दुपारी १२.३० वाजता कणकवली तालुका, दुपारी १ वाजता देवगड तालुका, दुपारी १.३० वाजता दोडामार्ग तालुका, दुपारी २ वाजता वैभववाडी तालुका, दुपारी २.३० वाजता मालवण तालुक्याची बैठक होणार आहे. दुपारी ३ वाजता राखीव.

त्यानंतर सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. सायंकाळी ६ वाजता ते मोटारीने ओरोस येथून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.

तरी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + sixteen =