You are currently viewing सावंतवाडीत १ ते ३ मे दरम्यान जिल्हास्तरीय खुली कॅरम स्पर्धा

सावंतवाडीत १ ते ३ मे दरम्यान जिल्हास्तरीय खुली कॅरम स्पर्धा

सावंतवाडीत १ ते ३ मे दरम्यान जिल्हास्तरीय खुली कॅरम स्पर्धा

काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये रंगणार स्पर्धा; सहभागी खेळाडूंना मोफत टी-शर्ट व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभापती मोहिनी मडगावकर यांच्या संकल्पनेतून शहरात १ ते ३ मे २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आणि सचिन घाडी मित्रमंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा काझी शहाबुद्दीन हॉल येथे पार पडणार आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी सर्व खेळाडूंना मोफत टी-शर्ट देण्यात येणार असून पहिल्या ८ क्रमांकांपर्यंत रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी विशेष पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत.
ही स्पर्धा एकाच खुल्या गटात होणार असून सर्व खेळाडूंना अधिकृत गणवेशात खेळणे बंधनकारक आहे. इच्छुकांनी ३० एप्रिलपर्यंत नावनोंदणी करून गोट्या सावंत, शुक्राचार्य म्हाडेश्वर, ओंकार कुबल, अनिल कम्मार, प्रकाश प्रभू किंवा संतोष बनसोडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा