You are currently viewing कुसबे, कुंदे, घावनळे, आकेरी येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा झंझावात

कुसबे, कुंदे, घावनळे, आकेरी येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा झंझावात

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने

५ कोटी ११ लाखाच्या कामांना सुरुवात*

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजने अंतर्गत कुसबे गावात नळपाणी योजनेसाठी ७५ लाख ५५ हजार निधी, कुंदे गावातील नळपाणी योजनेसाठी १ कोटी ७० लाख निधी, घावनळे गावातील नळपाणी योजनेसाठी २ कोटी, आणि आकेरी गावातील नळयोजने साठी ६५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या कामांची भूमिपूजने करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी घावनळे येथे शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, शिवसेना नेते अतुल बंगे,विभाग संघटक प्रभाकर वारंग, माजी उपसरपंच दिनेश वारंग, घावनळे सरपंच आरती वारंग,उपसरपंच योगेश घाडीगांवकर, शाखा प्रमुख संतोष नागवेकर, ग्रा. पं. सदस्य, रिया नागवेकर, श्रध्दा तावडे,स्वरा धुरी,दीपिका घाडीगांवकर, प्रभाकर जाधव,योगेश पारकर,पंढरी पारकर,रुपेश सावंत,सदगुरू घावनळकर, अमोल पालव, संदीप पारकर, महादेव कोरगावकर, पांडू तोरस्कर,रामा कोकरे,योगेश सावंत,सचिन नार्वेकर,
कुसबे येथे सरपंच समीक्षा जाधव,उपसरपंच भाग्यश्री घाडीगावकर, राजू घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर, दीपक भोसले, अरुण सावंत, ललित घाडीगावकर. विजय म्हाडेश्वर, नितीन म्हाडेश्वर,विश्राम हुले, मनीष तामणेकर, दिवाकर म्हाडेश्वर, सावळाराम घाडीगावकर आदी.
कुंदे येथे शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन कदम, शाखाप्रमुख विरेश परब, सरपंच रुपेश तायशेटे उपसरपंच उल्का खांदारे, सदस्य नीलम राणे, सुनयना पवार, सतीश शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष अनाजी राणे
नारायण चव्हाण, रामा बोडेकर, शेखर परब, अनिल जंगले, सुनील पवार, लक्ष्मण पवार, महेंद्र पवार, विठ्ठल बोडेकर, आयुष परब, आदी.
आकेरी येथे माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, बंड्या कुडतरकर, अजित करमलकर, सरपंच महेश जामदार, उपसरपंच प्रमोद घोगळे, सदस्य गुरुनाथ पेडणेकर, मेघा गावडे, संतोष गावडे, रामा गावडे, सूर्यकांत घाडी, संतोष सातार्डेकर, उमेश परब, मेधज केसरकर, गणेश गावडे, रुपाली पेडणेकर, बापू तेली, विनायक वालावलकर, संजय वालावलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 18 =