You are currently viewing वेताळ बांबर्डे येथील आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेताळ बांबर्डे येथील आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा आरोग्य तपासणी शिबीर उपक्रम…

कुडाळ

मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी हेल्थकेअर क्लिनिक, मुंबई व जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सभागृह येथे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव राजेश टंगसाळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

सदर शिबिरास वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने संपूर्ण शारीरिक तपासणी, ऍक्युप्रेशर व फिजिओथेरपी आणि मधुमेह, थायरॉईड,कॅन्सर,सिरम कॅल्शियम,हिमोग्लोबिन आदी रक्त तपासणीचा सुमारे शंभराहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला.

गावच्या सरपंच सौ संध्या मेस्त्री व उपसरपंच दिनेश कदम, ग्रामविकास अधिकारी बी.डी.पिंटो यांनी शिबिरासाठी उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व मनसे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.मनसेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल वेताळ बांबर्डे वासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा