You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रिमियम बससेवा कार्यान्वित

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रिमियम बससेवा कार्यान्वित

*छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रिमियम बससेवा कार्यान्वित*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बेस्ट उपक्रमाने अलिकडेच ‘बेस्ट चलो अॅप वर आधारित प्रिमियम बससेवा सुरू केलेली असून या सेवांना प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद प्राप्त होत आहे. या अनुषंगाने शनिवार दि. ११ फेब्रुवारी २०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून शहराच्या विविध भागात खालीलप्रमाणे बससेवा कार्यान्वित करण्यात येत आहेत.

१. एअरपोर्ट सेवा १:- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बॅकबे आगार – दक्षिण मुंबई
२. एअरपोर्ट सेवा – २ :- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर – नवी मुंबई

या बससेवेच्या प्रवर्तनाबाबतची संपूर्ण माहिती ‘बेस्ट चलो ” या मोबाईल अॅप मधील चलो बस ” या पर्यायावर उपलब्ध करण्यात आली आहे.

तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याकरिता आपल्या मोबाईलवर “चलो अॅप” डाऊनलोड करून घ्यावे व या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्टचे जनता संपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + sixteen =