You are currently viewing “अगतिकता”

“अगतिकता”

“अगतिकता”

जेव्हा कधी तू दूर जाशील
तेव्हा माझ्यासाठी एक करशील का?
उभ्या आयुष्यात सोबत केलेली
माझी आठवण जपशील का?

नजरेत तुझ्या उतरताना कधी
अश्रू आलेच नयनी माझ्या तर
त्या तरळणाऱ्या अनमोल अश्रूंना
तू तिथेच गोठवून टाकशील का?

मार्ग वेगळा निवडताना तुझा
कधी दूर दूर जाताच पुन्हा एकदा
आयुष्याच्या नव्या वळणावर
माझ्यासाठी मागे वळून पाहशील का?

जीवनभर साथ द्यायच्या वचनासाठी
हाती दिलेला हात तुझा कधी
अलगद सुटून जात असेल तर
पुन्हा एकदा घट्ट पकडून ठेवशील का?

हळू हळू साथ सोडून दूर जाणारा
तुझ्याचसाठी अडकलेला,घुसमटलेला
अखेरचा हा श्वास माझा
देवाकडून पुन्हा मागून घेशील का?
पुन्हा मागून घेशील का???

(दिपी)
दीपक पटेकर…!!
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा