You are currently viewing दिवाळी

दिवाळी

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.प्रवीण उर्फ जी.आर.जोशी यांची काव्यरचना*

शतजन्माचे पुण्य उजळले
अवघ्या ह्या विश्वात
दीप हो ,दिसला अंधारात ।। धृ ।।

युगायुगांची मानव महती
राम कृष्ण अवतार घेती
पंचभुतांच्या या दुनियेला
का ? झाला आघात
दीप हो, दिसला अंधारात ।। 1 ।।

पिढ्यानपिढ्या , इथे नांदले
आयुष्याचे ओझे वाहीले
सुखदुःखाचे गाणे गाऊन
अंगणी फुलला पारिजात
दीप हो,दिसला अंधारात

कुठला कोण? क्षुद्र विषाणु
पोकळ केले त्याने अणुरेणू
लसीकरण चा वाजता वेणु
मानवगीत गाई आनंदात
दीप हो दिसला अंधारात

अली “दिवाळी “सोन पाऊली
कोरोना चे विष ही जाळी
लक्ष लक्ष दीप उजळीत
देऊ ‘एकमेकांना’ हात
दीप हो ,दिसला अंधारात

©प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी
अंकली बेळगांव
कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =