You are currently viewing कामळेवीर येथे विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ आणि सिंधू रक्त मित्र कुडाळ शाखा  आयोजित रक्तदान शिबिरात ५३ जणांचे रक्तदान

कामळेवीर येथे विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ आणि सिंधू रक्त मित्र कुडाळ शाखा  आयोजित रक्तदान शिबिरात ५३ जणांचे रक्तदान

बांदा

श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी महिला रक्तदात्यांचाही चांगला प्रतिसाद लाभला.

कामळेवीर येथे नव्यानेच स्थापन झालेल्या या मंडळाने आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करताना समाजोपयोगी रक्तदान शिबिराने सुरुवात केली.
यावेळी प्रा.आ.केंद्र हिर्लोकच्या सहाय्याने आरोग्य तपासणी शिबिरही आयोजीत करण्यात आले, या शिबिरालाही उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदान व संस्थेविषयी मार्गदर्शन केले तसेच लाईफ टाईम हॉस्पिटलचे मनिष यादव यांनी रक्तदान विषयी मार्गदर्शन केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रवीण गोवेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
आरोग्य तपासणी शिबिरासाठी (रक्तदाब,शुगर,इ.)श्री. आर.डी.चेंदवणकर, श्रीम.अंकिता गावकर (सीएचओ, )श्री.गौरी घाडी व नारुरकर आशा सेविका इ. उपस्थित होते.
यावेळी श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढेही मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प मंडळाने व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − one =