You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहचा फ्रिजर बंदावस्थेत – देव्या सूर्याजी

उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहचा फ्रिजर बंदावस्थेत – देव्या सूर्याजी

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील नव्यानं बसविण्यात आलेला फ्रीजर पुन्हा बंद अवस्थेत आहे. नव्यानं बसविलेला फ्रीजर कुलिंग देत नसल्यानं तो निरूपयोगी ठरत आहे. यामुळे आपत्कालात मृतदेह ठेवायचा कुठे ? असा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य सेवेतील अभावामुळे जिवंत पणी होणारा त्रास मेल्यानंतरही पाठ सोडत नाही आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नव्यान बसविलेला फ्रीजर कुलिंग देत नसेल तर त्या व्यवहाराची सखोल चौकशी होण आवश्यक आहे. सावंतवाडीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी याचा पाठपुरावा करणं आवश्यक होतं. मात्र, त्यांचा याकडे दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय अधिक्षकांनी ७ दिवसांत यावर तोडगा काढावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे.

मागे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकाम व रुग्णालय प्रशासनाने तातडीने ह्याची दखल घेतली होती. नव्यानं फ्रीजर बसविला. परंतु, उपजिल्हा रुग्णालयात असलेला शवागृहातील कुलिंग न देत असल्यानं तो कुचकामी ठरत आहे. रात्री-अपरात्री मृतदेह ठेवायचा कुठे ? हा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे‌‌. नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जीवंतपणी होणारे हाल समोर असतानाच आता मेल्यानंतरही मृतदेहांची अवहेलना वैद्यकीय अधिक्षकांच्या कारभारामुळे होत आहे. यासंदर्भात तातडीन उपायोजना करावी व कुलिंग न देणाऱ्या नव्या फ्रीजरच्या व्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे. तर शवगृहाच्या इमारतीच्या सुधारणेसाठी बांधकाम विभागाचही लक्ष त्यांनी वेधलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा