You are currently viewing फोंडाघाट येथे प.पू.पुर्णानंद स्वामींच्या पादुका पालखीची सवाद्य मिरवणुक

फोंडाघाट येथे प.पू.पुर्णानंद स्वामींच्या पादुका पालखीची सवाद्य मिरवणुक

‘पुर्णानंद भवन’लोकार्पण सोहळा व ‘पुर्णानंद पर्णकुटी’ प्रवेशारंभ उद्या ;उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची उपस्थिती

फोंडाघाट :

फोंडाघाट येथील ‘पुर्णानंद भवन’ या वास्तूचा लोकार्पण सोहळा व ‘पुर्णानंद पर्णकुटी’ प्रवेशारंभ उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ रोजी होत आहे. शनिवारी सायंकाळी वालावलकर पेट्रोलपंप ते पुर्णानंद भवनपर्यंत दाभोली मठातील प.पू.पुर्णानंद स्वामींच्या मठातील पादुका पालखी सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञाती बांधव, सहभागी झाले होते. यावेळी महिलांचाही मोठा सहभाग होता. प.पू. पुर्णानंद स्वामींच्या पादुकांचे पूजन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीचे कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सामंत, अरूण सामंत आदींनी पूजन करून पादुका पालखी मिरवणुक फोंडाघाट बाजारपेठेतून पुर्णानंद भवनपर्यंत काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या पालखी मिरवणुकीत दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चा नामघोष मिरवणुकीत सुरू होता. या पालखी सोहळयात डॉ. एम.डी. देसाई, शशिकांत ठाकूर गुरूजी, बाळ महाजन, रंजन नेरूरकर, अॅड. न्हानू देसाई, प्रभूगुरूजी, पंढरी वायंगणकर, योगेश प्रभू, अनिकेत वालावलकर, सुयोग टिकले, हेमंत परूळेकर, प्रथमेश महाजन, विद्याधर केळूस्कर, सुनिल तारळेकर आदी अनेक ज्ञाती चे पुरूष व महिला सहभागी झाले होते.

ना. उदय सामंत यांची उपस्थिती :
पुर्णानंद भवन चा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी पुर्णानंद पर्णकुटीचे प्रवेशारंभही आज रविवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी श्रीमत् दाभोली मठाचे कार्याध्यक्ष विकास प्रभू, उद्योजक दत्ता सामंत, गौरीशंकर खोत आदी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 2 =