You are currently viewing साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर यांचा स्तुत्य उपक्रम व सन २०२४ कडून अपेक्षा

साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर यांचा स्तुत्य उपक्रम व सन २०२४ कडून अपेक्षा

*मुलांना चांगले शिक्षण मिळावे*

 

सावंतवाडी :

नववर्ष २०२४ कडून माझ्या काय अपेक्षा आहेत? या विषयाचा विचार करताना मी थोडा सीमित विचार केला, माझ्या मुलखापुरता विचार केला. समस्या तर अनेक आहेत, अपेक्षाही अनेक आहेत, त्या त्या ठिकाणी त्या बरोबरही आहेत; परंतु माझ्या अपेक्षा ह्या शिक्षणक्षेत्राविषयी आहेत. विशेषतः प्राथमिक शिक्षणाविषयी आहेत.

सध्या गावातल्या अनेक प्राथमिक शाळेत मुलांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे पटसंख्येनुसार शिक्षकही कमी आहेत. माझ्याच गावच्या शाळेत सात वर्ग आहेत, सुमारे ९० मुले आहेत; पण शिक्षक चारच आहेत. शाळेत सेमी इंग्लिश अभ्यासक्रम आहे. माझे स्पष्ट मत आहे की, एवढी शिक्षक संख्या त्या मुलांना न्याय देऊ शकत नाही. मग अश्या वेळेस आपण काय करू शकतो?

शाळेचे अनेक माजी विद्यार्थी, गाववाले, काही दानशूर व्यक्ती सहकार्य करू इच्छितात, पण ते वस्तुरूपात वा पैशाच्या रूपात. उलट गरज आहे ती मुलांना लाईव्ह शिक्षण मिळायची आणि त्याचीच इथे कमतरता आहे. प्रत्येक गावाचा अट्टाहास आहे की, आपल्या गावातली शाळा बंद होऊ नये. त्यामुळे अपुऱ्या मुलांच्या संख्येमध्येही ते तिथल्या शाळा चालू ठेवू इच्छितात आणि सरकार तर एवढ्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक देऊ शकत नाही. काही प्रमाणात ते अव्यवहार्यही आहे.

मग जर आपली शाळा मोठ्या शाळेला जोडू द्यायची नसेल, तर याला एक उपाय आहे. तो म्हणजे गावातल्या लोकांनीच मुलांना अधिकचं शिकवायचं. गावात असलेल्या सर्व संस्थांनी/मंडळांनी एकत्र यावं आणि मुलांना किमान सातवीपर्यंत तरी योग्य तऱ्हेने शिक्षण मिळण्याची व्यवस्था करावी. म्हणजे सरळ मुलांना शिकवावंच. प्रथम हे शिकवलं जाण्यासाठी मुलांच्या शिक्षणाविषयी एक आराखडा तयार करावा व तो अमलात आणावा; जेणेकरून मुलं हायस्कूलमध्ये सक्षमपणे पाय ठेवतील. गावात अनेक निवृत्त शिक्षक असतात, निवृत्त चाकरमानी असतात. ज्यांना आर्थिक चणचण नाही, पेन्शन आहे अशां सर्वानी एकत्र येऊन मुलांना शिकवावं.

गतवर्षीपासून आम्ही आमच्या गावात हे सुरू केलंय. आमच्या गुरुजींच्या नावाने ‘ पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान ‘नावाची संस्था स्थापन केलीय आणि त्यामार्फत मुलांना रोज दोन तास शिष्यवृत्ती, इंग्लिश ग्रामर, अवांतर वाचन अश्या गोष्टी शिकवतो. मला वाटतं प्रत्येक गावातच असं व्हावं, सर्व मुलांसाठी असं व्हावं. बस् एवढीच २०२४ कडून अपेक्षा!

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

 

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा