You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 1 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवार दि. 1 मे 2021 रोजी सकाळी 8.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थिती, सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, सकाळी 9.30 वा. बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, एम.आय.डी.सी. पिंगुळी, कुडाळ येथे बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय येथे तयार केलेल्या 25 खाटांच्या मोफत कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वा. कुडाळ ग्रामिण रुग्णालय येथे लसीकरण केंद्राची पाहणी, सकाळी 10.30 वा. कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे लसीकरण केंद्राची पाहणी, दुपारी 12.00 वा. सावंतवाडी येथून मोटारीने दोडामार्ग कडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. ग्रामिण रुग्णालय, दोडामार्ग येथे लसीकरण केंद्राची पाहणी, दुपारी 1.30 ते 2.00 राखीव, दुपारी 2.00 वा. दोडामार्ग येथून मोटारीने गोवा विमानतळ, दाभोलीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + six =