You are currently viewing सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले स्वागत…

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले स्वागत…

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कुडाळ येथे स्वागत केले. यावेळी कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले.
कुडाळ येथील कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आज आले होते. यावेळी त्यांचे अनंत पिळणकर यांनी स्वागत करताना जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, देवेंद्र पिळणकर आधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी जिल्ह्यातील सहकारातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा