You are currently viewing रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात अंगारक संकष्टी चतुर्थी साजरी…

रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात अंगारक संकष्टी चतुर्थी साजरी…

वेंगुर्ले

रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात अंगारक संकष्टी चतुर्थी मोठ्या उत्साहात व साध्या पद्धतीत साजरी करण्यात आली. प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या रेडी नागोळेवाडी येथील द्विभुज गणपती मंदिरात गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूमुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. यावर्षी सुद्धा कोरोनाविषाणूचे सावट होते, परंतु आता कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी झाल्याने आज मंगळवारी द्विभुज गणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

भाविक मोठ्या उत्साहाने अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त रेडी येथे दाखल झाले होते. गजानन देवस्थान कमिटी तर्फे भाविकांना फक्त लांबून गणपती दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. देवस्थान समिती व भाविकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून सामाजिक अंतर ठेवून मास्क लावून व सॅनिटायझर चा वापर करून मंदिरात प्रवेश दिला जात होता. प्रत्येक अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त हजारो भाविक अगोदरच्या दिवसापासून रेडी गावात दाखल होतात. परंतु कोरोणा विषाणू संसर्गामुळे, तसेच जिल्ह्याच्या बाहेरील सीमा बंद असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील भाविक येऊ शकले नाहीत. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली नाही. मात्र परिसरातील भाविकांनी मोठ्या उत्साहाने व साध्या पद्धतीत द्विभुज गणपतीचे दर्शन घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 13 =